हमीनिधी कर्ज योजना
कर्ज वाटप : जास्तीत जास्त कर्ज मर्यादा रु. २० ,००,०००/- इतके. २४० मासिक हप्त्यात कर्जाची परतफेड. व्याजदर द.सा.द.शे. ९.३०%
बचत फंड कर्ज योजना
कर्ज वाटप : जास्तीत जास्त कर्ज मर्यादा जमेच्या ७५% इतके. ६० मासिक हप्त्यात कर्जाची परतफेड. व्याजदर द.सा.द.शे. ६.२०%
तातडीचे कर्ज योजना
मुदत ठेव योजना
तसेच मुदतपूर्व मुदत ठेव रक्कम परत घेतल्यास ज्यादा देण्यात आलेले व्याज सभासदाच्या मुदत ठेव रकमेतून वसूल करण्यात येईल.
आवर्ती ठेव योजना
आवर्ती ठेव :स्वेछासेवानिवृत्ती /आकस्मिक निधन अथवा काही कारणास्तव सभासदास आवर्ती ठेव खात्यातील रक्कम परत द्यावयाची असल्यास त्यावर द.सा.द.शे. ३% दराने व्याज देण्यात येईल.
मरणोत्तर सहाय्य निधी योजना
सभासद मृत पावल्यास त्याच्या कुटुंबियास रु. ५,०००/- इतकी तातडीची मदत. मृत्यू पावलेला सभासद नियमित असल्यास उर्वरित कर्ज माफ करण्यात येते.
परस्पर सहाय्य निधी योजना
निवृत्ती समयी सभासदास त्यांच्या सभासदत्वाच्या कालावधीनुसार जमा रकमे व्यतिरिक्त जादा रक्कम अदा करण्यात येते.
शैक्षणिक पारितोषिक योजना
सभासदाच्या पाल्यास १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर अथवा इतर अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य प्राप्त केल्यास बक्षिसाची रक्कम NEFT द्वारे सभासदांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. तसेच ज्या पाल्यांनी उच्चं शिक्षण घेऊन भरघोस यश संपादन केले आहे, अशा पाल्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आमंत्रित केले जाते तसेच त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येते.
सभासद कल्याण निधी योजना
गंभीर आजार उदा. हृदयासंबंधित शस्त्रक्रिया अथवा कॅन्सरसारख्या आजाराकरिता सभासदास व सभासदाच्या पती / पत्नीस जास्तीत जास्त रु. २५,०००/- इतकी रक्कम विना परतावा मदत म्हणून देण्यात येते.
कन्यादान योजना
रु. ५,००१/- इतकी रक्कम सभासदाच्या कन्येच्या लग्नाप्रित्यर्थ विना परतावा मदत म्हणून देण्यात येते. (२ मुलींपर्यंत)
कर्ज सुरक्षा योजना
हमीनिधी कर्ज संरक्षित करण्यात येते.
फायडेलिटी बॉंड
२ वर्षाकरिता प्रत्येकी रु. ३,०००/- साठी रु. ३००/- जीडीएस व बीपीएम : रु. १,००,०००/- साठी ५ वर्षाकरिता रु. २५,०००/-
विश्राम गृह
मळवली लोणावळा येथे संस्थेचे विश्रामगृह बांधण्यात आले आहे. हि संस्थेची आजवरची प्रथम स्थावर मालमत्ता आहे. सदर विश्रामगृह सव सभासदांना अल्प दारात उपलब्ध करण्यात आले आहे.