ब्रिटीश पोस्टमास्तर जनरल सर ह्युबर्ट सॅम्स यांनी १९१४ साली टपाल कर्मचारी कर्जरुपी मायाजालात अडकल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या टपाल कामगारांसाठी '' बॉम्बे पोस्टल को-ऑप सोसायटी लि. ची बॉम्बे जी.पी.ओ. च्या वास्तुत स्थापना केली. सुरुवातीला मुंबई इलाख्या पुरतीच मर्यादित असलेली ही संस्था हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारलेली आहे. ३४४ सभासद व रु. ८,१२५/- इतक्या भांडवलामध्ये सुरु झालेल्या या संस्थेने आता १३२६९ सभासद व रु. ६२,८२,०४,३९०/-ईतके भांडवल असा टप्पा गाठला आहे.कित्येक वर्षे संस्थेचं लेखापरीक्षणा मधील ''अ'' वर्ग अबाधित आहे.
माननीय श्री अमिताभ सिंग साहेब (IPoS) चीफ पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र आणि गोवा सर्कल,यांनी संस्थेच्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी दिलेल्या शुभेच्छा.
देणगी
दि.३०/०९/१९९३ रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्यात झालेल्या भूकंपामुळे मुख्यमंत्री भूकंप साहाय्य निधीला सोसायटीच्या वतीने रु.२५,०००/- चा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
३ मे १९९९ रोजी सुरु झालेल्या कारगिल घुसखोरी प्रकरणी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबियांना सामाजिक बांधिलकी व कर्तव्य भावनेने सोसायटीच्या वतीने रु.१,२५,०००/-इतकी रक्कम टाइम्स ऑफ इंडियाच्या कारगिल मदत निधीकडे सुपूर्त करण्यात आली..
२९/१०/१९९९ रोजी ओरिसातील वादळग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीरु.५१,०००/-इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्य निधी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
दि. २६/०१/२००१ रोजी भूज येथील प्रलयकारी भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी रु. १,५१,०००/-चा धनादेश मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
दि. २६/१२/२००४ रोजी त्सुनामी आपदग्रस्तांना मदतीचा धनादेश मुख्य पोस्ट मास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल यांना सुपूर्त करण्यात आला.
दि. १६/०८/२०१८ रोजी केरळ राज्यातील पूरग्रस्त पोस्टल कर्मचाऱ्यांना रु.५,००,०००/-मदतीचा धनादेश मुख्य पोस्ट मास्तर जनरल यांना सुपूर्त करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील पुरग्रस्त पोस्टल कर्मचाऱ्यांना रु.११,११,१११/-मदतीचा धनादेश चीफ पोस्ट मास्तर यांना दि. २०/०८/२०१९ रोजी सुपूर्द केला
कोविड-२०१९ (कोरोनाविषाणू) या जागतिक संकटाच्या प्रसंगी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ यांना दि. ०८/०५/२०२० रोजी रु.५,५५,५५५/- इतक्या रकमेचा धनादेश सुपूर्त केला.
उपक्रम
Send Us Message
संस्थेची आर्थिक स्थिती २०२१ - २०२२
ठेवी
कर्जे
आर्थिक वर्ष २०२१ - २०२२ मध्ये वाटप केलेली कर्जे
संस्थेची आर्थिक स्थिती २०२२ - २०२३
ठेवी
कर्जे
आर्थिक वर्ष २०२२ - २०२३ मध्ये वाटप केलेली कर्जे
संस्थेची आर्थिक स्थिती २०२३-२०२४
ठेवी
कर्जे
आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये वाटप केलेली कर्जे
आवर्ती ठेव योजना
आवर्ती ठेव :स्वेछासेवानिवृत्ती /आकस्मिक निधन अथवा काही कारणास्तव सभासदास आवर्ती ठेव खात्यातील रक्कम परत द्यावयाची असल्यास त्यावर द.सा.द.शे. ३% दराने व्याज देण्यात येईल.
हमीनिधी कर्ज योजना
कर्ज : वाटप जास्तीत जास्त कर्ज मर्यादा रु. २०,००,०००/- इतके २४० मासिक हप्त्यात कर्जाची परतफेड व्याजदर द.सा.द.शे. ९.६०%
कर्ज मर्यादा | कर्ज परतफेडीचे हफ्ते |
---|---|
१. रु.३ लाख ते रु.५ लाखापर्यंत | १०० महिने |
२. रु.६ लाख ते रु.१० लाखापर्यंत | १५० महिने |
३. रु.११ लाख ते रु.१४ लाखापर्यंत | १८० महिने |
४. रु.१५ लाख ते रु.१८ लाखापर्यंत | २२० महिने |
५. रु.१९ लाख ते रु.२० लाखापर्यंत | २४० महिने |
बचत फंड कर्ज योजना
कर्ज : वाटप जास्तीत जास्त कर्ज मर्यादा जमेच्या ७५% इतके ६० मासिक हप्त्यात कर्जाची परतफेड व्याजदर द.सा.द.शे. ६.२०%
आकस्मिक कर्ज (तातडीचे कर्ज)