सभासद मासिक वर्गणी वाढ       |       मुदतठेवी वरील व्याजात वाढ द.सा.द.शे. ८.३५%    |    अमृत ठेव ०१ मे २०२४ पासून ते ३१ ऑगस्ट २०२४

Welcome to Our Website

ब्रिटीश पोस्टमास्तर जनरल सर ह्युबर्ट सॅम्स यांनी १९१४ साली टपाल कर्मचारी कर्जरुपी मायाजालात अडकल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या टपाल कामगारांसाठी '' बॉम्बे पोस्टल को-ऑप सोसायटी लि. ची बॉम्बे जी.पी.ओ. च्या वास्तुत स्थापना केली. सुरुवातीला मुंबई इलाख्या पुरतीच मर्यादित असलेली ही संस्था हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारलेली आहे. ३४४ सभासद व रु. ८,१२५/- इतक्या भांडवलामध्ये सुरु झालेल्या या संस्थेने आता १३२६९ सभासद व रु. ६२,८२,०४,३९०/-ईतके भांडवल असा टप्पा गाठला आहे.कित्येक वर्षे संस्थेचं लेखापरीक्षणा मधील ''अ'' वर्ग अबाधित आहे.

आपल्या संस्थेचे उपक्रम

View All

देणगी

उपक्रम

  • सन-१९८८ मध्ये संस्थेत सभासदांच्या खात्याची तपासणी व जुळणी करण्यासाठी संगणक बसविण्यात आला.
  • सन १९९१-१९९२ हे संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष. या वर्षात संस्थेने सभासदांना २% दराने अधीलाभांश दिला
  • सन-२००९-२०१० साली महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन ली. आयोजित आदर्श पतसंस्था पुरस्कार स्पर्धेत आपल्या संस्थेस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले .
  • सन-२०१२ मध्ये मळवली लोणावळा येथे संस्थेने विश्रामगृह बांधले. त्याचा लाभ अनेक टपाल कर्मचारी घेत आहेत.
  • सन-२०१२-१३ साली संस्थेने शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केले. याच वर्षी आपल्या संस्थेस मुंबई कोकण पगारदार पतसंस्था फेडरेशन तर्फे ''उत्कृष्ट पगारदार पतसंस्था '' म्हणून प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले.

Send Us Message

 

आर्थिक उलाढाल

ठेवी

  • मुदत ठेवीवरील व्याजदर २४ महिन्यांसाठी द.सा.द.शे. ८.३५%
  • मुदत ठेव रक्कम १२ महिन्याच्या आत परत घेतल्यास द.सा.द.शे. ४.००%
  • १३ व्या महिन्यानंतर मुदत ठेवीची मुदत पूर्ण व्हावयाच्या आत रक्कम परत घेतल्यास द.सा.द.शे. ६.००% दराने व्याज देण्यात येईल.
  • मुदत ठेवींचा २४ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच्या कालावधीसाठी व त्या पुढील कालावधीसाठी द.सा.द.शे ८.३५% दराने व्याज देण्यात येईल.
  • मुदत ठेवींसाठी असलेली २४ महिन्यांची मुदत पूर्ण झाल्यानंतर सदर मुदत ठेवीचे नुतनीकरण करण्याची आवश्यकता नाही. सदर मुदत ठेवीचे स्वयं नुतनीकरण सोसायटी मार्फत करण्यात येईल.
  • मुदतपूर्व मुदत ठेव रक्कम परत घेतल्यास ज्यादा देण्यात आलेले व्याज सभासदाच्या मुदत ठेव रकमेतून वसूल करण्यात येईल.

आवर्ती ठेव योजना

  • व्याजाचा दर द.सा.द.शे. ७.००%
  • मुदत २ वर्ष

आवर्ती ठेव :स्वेछासेवानिवृत्ती /आकस्मिक निधन अथवा काही कारणास्तव सभासदास आवर्ती ठेव खात्यातील रक्कम परत द्यावयाची असल्यास त्यावर द.सा.द.शे. ३% दराने व्याज देण्यात येईल.

कर्जे

हमीनिधी कर्ज योजना

कर्ज : वाटप जास्तीत जास्त कर्ज मर्यादा रु. २०,००,०००/- इतके २४० मासिक हप्त्यात कर्जाची परतफेड व्याजदर द.सा.द.शे. ९.६०%

कर्ज मर्यादा कर्ज परतफेडीचे हफ्ते
१. रु.३ लाख ते रु.५ लाखापर्यंत १०० महिने
२. रु.६ लाख ते रु.१० लाखापर्यंत १५० महिने
३. रु.११ लाख ते रु.१४ लाखापर्यंत १८० महिने
४. रु.१५ लाख ते रु.१८ लाखापर्यंत २२० महिने
५. रु.१९ लाख ते रु.२० लाखापर्यंत २४० महिने

बचत फंड कर्ज योजना

कर्ज : वाटप जास्तीत जास्त कर्ज मर्यादा जमेच्या ७५% इतके ६० मासिक हप्त्यात कर्जाची परतफेड व्याजदर द.सा.द.शे. ६.२०%

आकस्मिक कर्ज (तातडीचे कर्ज)

  • रु. ५००००/- पर्यंत मासिक वेतन असणाऱ्यांना रु. ३००००/-
  • रु. ५०००१/- ते रु. १०००००/- मासिक वेतन असणाऱ्यांना रु . ६००००/-
  • रु. १००००१/- वरील मासिक वेतन असणाऱ्यांना रु. ८००००/-
  • कर्जाची परतफेड, १२ समान मासिक हप्ते
  • व्याजदर ९.००% (Flat)